आपल्या शारीरिक आणि आत्मिक जीवनात नेहमी अनेक संकटे आणि अडथळे येतात. गतकाळात, जेव्हा इस्राएल लोकांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागला —पाणी व अन्नाशिवाय वाळवंट आणि दिग्गज राहत असलेला कनान देश, तेव्हा यहोशवा आणि कालेब यांनी आपली आशा फक्त परमेश्वरावर ठेवली. त्यांच्याप्रमाणे, अडचणींमध्येही परमेश्वराने उघडलेले आशेचे दार पाहण्याचा विश्वास आपल्याला हवा आहे.
ज्याप्रमाणे येशूच्या पुनरुत्थान व स्वर्गारोहणाद्वारे, परमेश्वराने वधस्तंभामुळे निराश झालेल्या आदिमंडळीच्या संतांसाठी स्वर्गाच्या राज्याचे आशेचे दार उघडले, आणि ज्याप्रमाणे येशूने रात्रभर काहीही न पकडलेल्या पेत्राला वचनानुसार चालण्याचा चमत्कार दाखवला, त्याचप्रमाणे आजही ख्रिस्त आन सांग होंग यांचे, “सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल,” हे वचन निश्चितपणे पूर्ण होईल.
“हे परमेश्वरा, माझा अंतकाळ केव्हा आहे, व माझे आयुष्यमान किती आहे, हे मला समजू दे; म्हणजे मी किती नश्वर आहे हे मला कळेल. तर आता हे प्रभू, मी कशाची अपेक्षा करू? माझी आशा तुझ्याच ठायी आहे. स्तोत्रसंहिता ३९:४–७
परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल. सर्व राष्ट्रांना साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल, तेव्हा शेवट होईल. मत्तय २४:१३–१४
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण