ज्या दिवशी मोशे दहा आज्ञांच्या दुसर्या पाट्या घेऊन खाली आला होता, तो दिवस परमेश्वराने पायश्चित्ताचा दिवस म्हणून नियुक्त केला आणि मांडवांचा सण तो सण होता ज्या दरम्यान इस्राएल लोकांनी दहा आज्ञांच्या दगडी पाट्या ठेवण्यासाठी निवासमंडपाचे निर्माण कार्य केले.
जसे की ३,५०० वर्षांपूर्वी पाहिले जाऊ शकते, परमेश्वराचे मंदिर निर्माण करण्याचा सर्वात महत्वाचा पैलू, त्यामध्ये सहभागी सहभागी होण्यास इच्छुक असलेले आणि प्रेरित असलेले हृदय असणे हा आहे.
अशा लोकांनी मंदिराच्या निर्माण कार्यासाठी विपुल प्रमाणात सामग्री अर्पण केली.
आज, संपूर्ण जग ख्रिस्त आन सांग होंग जी आणि स्वर्गीय यरुशलेम माता यांच्याकडे येत आहे कारण की, परमेश्वराच्या लोकांना यरुशलेम मंदिराच्या निर्मिती कार्यातील विविध सामग्रीच्या रुपात दर्शवण्यात आले आहे.
एक भविष्यवाणी आहे की, ज्याप्रमाणे जुन्या करारामध्ये मांडवांच्या सणासाठी निरनिराळ्या डहाळ्या एकत्र करण्यात आल्या
होत्या, त्याचप्रमाणे परमेश्वराचे लोक विविध प्रकारच्या झाडांच्या रुपात यरुशलेममध्ये एकत्र येतील.
नंतर ज्यांच्या अंतःकरणात स्फूर्ती झाली व ज्या कोणाला मनापासून इच्छा झाली, त्याने दर्शनमंडपाच्या कामासाठी, त्यातील सगळ्या सेवेसाठी आणि पवित्र वस्त्रांसाठी परमेश्वराला अर्पण आणले.
ज्यांना मनापासून इच्छा झाली ते सगळे स्त्रीपुरुष आले . . .
निर्गम ३५:२१–२२
प्रेषित व संदेष्टे ह्या पायावर तुम्ही रचलेले आहात; स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे;
त्याच्यामध्ये सबंध इमारत जोडून रचली असता प्रभूच्या ठायी वाढत वाढत पवित्र मंदिर होते;
प्रभूच्या ठायी तुम्हीही आत्म्याच्या द्वारे देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले जात आहात.
इफिसकरांस २:२०–२२
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण