जसे म्हटले जाते, “वाळवंटात सोन्यापेक्षा पाणी अधिक मौल्यवान आहे आणि हरवलेल्या मेंढरासाठी राजापेक्षा मेंढपाळ अधिक मौल्यवान आहे,” त्याप्रमाणे या पृथ्वीवर जे मौल्यवान आहे आणि स्वर्गाच्या राज्यात जे मौल्यवान आहे ते खूप वेगळे आहे. जगातील पुष्कळ लोक ज्या संपत्ती, सन्मान आणि सामर्थ्याला मौल्यवान मानतात, त्यांची स्वर्गाच्या राज्यात काहीच किंमत नाही. म्हणूनच, सुरुवातीच्या चर्चचे संत छळामध्येही स्वर्गाच्या राज्यासाठी जगले.
परमेश्वराच्या राज्यात, सर्वात मौल्यवान कार्य परमेश्वराच्या वचनाला आचरणात आणणे आहे. चर्च ऑफ गॉडचे सदस्य परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवून नवीन कराराच्या सत्याने एका हरवलेल्या आत्म्यालाही शोधतात, की ते स्वर्गाच्या राज्यात राजे म्हणून राज्य करतील आणि सदासर्वकाळ ताऱ्यांप्रमाणे चमकतील.
हे सर्व जण विश्वासात टिकून मेले; त्यांना वचनानुसार फलप्राप्ती झाली नव्हती, तर त्यांनी ती दुरून पाहिली व तिला वंदन केले आणि आपण ‘पृथ्वीवर परके व प्रवासी’ आहोत असे पत्करले. इब्री लोकांस पत्र ११:१३
जे सुज्ञ असतील ते अंतराळाच्या प्रकाशासारखे झळकतील; पुष्कळ लोकांना नीतिमत्तेकडे वळवणारे लोक युगानुयुग तार्यांप्रमाणे चमकतील. दानीएल १२:३
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण