परमेश्वराच्या नियमांचे पालन करणाऱ्या जीवनात, आपल्यासाठी नेहमीच विपुल आशीर्वाद तयार असतात. या कारणास्तव, पिताच्या युगापासून परमेश्वराने स्थापित केलेल्या शब्बाथ आणि वल्हांडण यांसारख्या सणांमध्ये, नेहमी ही आज्ञा असते, “विसरू नका, पण त्यांचे स्मरण करा आणि कायमचे पाळा.”
बायबल म्हणते की, जे सर्व युगांमध्ये परमेश्वराच्या नियमाचे पालन करतात ते नीतिमान म्हणून आशीर्वादित होतील, आणि जे परमेश्वराच्या नियमाचे उल्लंघन करतात ते बंडखोरीसाठी दोषी ठरतील. इस्राएल लोकांची बाबेलमधील कैद, परमेश्वराच्या नियमांचे पालन न केल्याचा परिणाम होता.
आणि आमचा देव परमेश्वर ह्याने आपले सेवक जे संदेष्टे ह्यांच्या द्वारे आमच्यापुढे ठेवलेल्या त्याच्या नियमशास्त्राप्रमाणे वर्तण्यासंबंधाने आम्ही त्याची वाणी ऐकली नाही. सर्व इस्राएल लोकांनी तुझ्या नियमशास्त्राचे उल्लंघन केले आहे; त्यांनी पराङ्मुख होऊन तुझी वाणी ऐकली नाही; म्हणून आमच्यावर शापाचा वर्षाव झाला आहे; देवाचा सेवक मोशे ह्याच्या नियमशास्त्रात लिहिलेल्या शपथेप्रमाणे झाले आहे. कारण आम्ही त्याच्याविरुद्ध पाप केले आहे. दानीएल ९:१०–११
माझ्या नियमांप्रमाणे चालतो, व माझे निर्णय पाळून सत्याने वागतो, तोच नीतिमान होय; तो खातरीने वाचेल, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. यहेज्केल १८:९
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण