मनुष्यजातीचे तारणकर्ता, परमेश्वराने वल्हांडणाच्या माध्यमातून आपल्याला पापांची क्षमा
आणि सार्वकालिक स्वर्गाच्या राज्याचे आशीर्वाद दिले आहेत आणि जोरदारपणे घोषणा केली आहे की
जे लोक वल्हांडण सण पाळतील त्यांना परमेश्वराचे लोक म्हणून स्वीकारले जाईल
जे स्वर्गाचे नागरिकत्व प्राप्त करतील आणि तारण प्राप्त करतील.
येशू जे २,००० वर्षांपूर्वी आले होते, तसेच या युगामध्ये ख्रिस्त आन सांग होंग आणि
माता परमेश्वर यांनी आपल्याला सातत्याने शिकवले की वल्हांडण सण न पाळता फक्त आपल्या ओठांनी
परमेश्वराचा धावा करणे हे एका अस्पष्ट विश्वासासारखे आहे.
तसेच, जे ठरलेल्या समयी वल्हांडण सण पाळण्यास असमर्थ असलेल्या लोकांसाठी
परमेश्वराने दुसरा वल्हांडण देण्याचे कारण हे आहे की वल्हांडण हा एक अतिशय महत्वाचा सण आहे
जो परमेश्वराच्या खर्या लोकांना वेगळे करतो.
नेमलेल्या समयी इस्राएल लोकांनी वल्हांडण सण पाळावा. . . .
एका मनुष्याच्या प्रेतामुळे अशुद्ध झालेले काही पुरुष होते, त्यांना त्या दिवशी वल्हांडण सण पाळता येईना, . . .
परमेश्वर मोशेला म्हणाला, . . . तरी त्याने परमेश्वराप्रीत्यर्थ वल्हांडण सण पाळावा.
दुसर्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी त्यांनी सण पाळावा; . . .
परंतु एखादा मनुष्य . . . वल्हांडण सण पाळण्याची हयगय केली तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा . . . .”
गणना ९:२–१३
ह्यास्तव तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यांना ओळखाल.
मला ‘प्रभूजी, प्रभूजी’ असे म्हणणार्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही;
तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल.
मत्तय ७:२०–२१
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण